Advertisement

सर्वपक्षीयांच्या लेखी कसा आहे अर्थसंकल्प?

प्रत्यक्षात कोणत्याही निधीचा खर्च पूर्ण केला जात नसल्याचा आरोप करत मुंबई बाहेरील रुग्णांना कोणत्याही परिस्थिती अधिक शुल्क आकारण्यास विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. हा कोणताही संकल्प नसलेला आणि जुन्याच अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचे कवर बदलून सादर केल्यासारखा अर्थसंकल्प असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सर्वपक्षीयांच्या लेखी कसा आहे अर्थसंकल्प?
SHARES

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा केवळ तरतुदीपुरताच असतो. परंतु, प्रत्यक्षात कोणत्याही निधीचा खर्च पूर्ण केला जात नसल्याचा आरोप करत मुंबई बाहेरील रुग्णांना कोणत्याही परिस्थिती अधिक शुल्क आकारण्यास विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. हा कोणताही संकल्प नसलेला आणि जुन्याच अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचे कवर बदलून सादर केल्यासारखा अर्थसंकल्प असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

अर्थसंकल्पात तर निधीची तरतूद केली जाते. परंतु, प्रत्यक्षात याचा खर्चच केला जात नाही. सायकल ट्रॅकच्या योजनेसाठी खर्च केला जाणारा निधी हा स्कायवॉकप्रमाणे वाया जाऊ शकतो. हा अर्थसंकल्प आजवरच सर्वात उदासिन असा अर्थसंकल्प आहे. यात नवीन काहीही नाही. तसेच जनतेच्या हिताचेही काही नाही.

रवी राजा, विरोधी पक्षनेते ,मुंबई महापालिका


या अर्थसंकल्पावर भाजपाची छाप आहे. छोट्यात छोट्या लोकांची काळजी घेण्यात आली आहे. 'पैसे द्या व वापरा' अशा शौचालयांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, मुंबईत २० हजार शौचालये बांधली जाणार आहेत. याबरोबरच एसआरए आणि म्हाडाच्या ओसी नसलेल्या इमारतींना सवलतीच्या दरत पाणी पुरवठा केला जाणार आहे.

मनोज कोटक, भाजपा गटनेते, महापालिका


महापालिका रुग्णालयात मुंबईतील रुग्णांना २० टक्के आणि बाहेरील रुग्णांना ३० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवण्यास समाजवादी पक्षाचा विरोध राहील. 'कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नाही', असे जरी आयुक्त सांगत असले, तरी यापूर्वीच सर्व प्रकारच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्यास परवानगी दिलेली आहे.

रईस शेख, गटनेता, समाजवादी पक्ष


विशेष राखीव निधीतून २ हजार कोटी उचलून अर्थसंकल्पाचा फुगा फुगवला आहे. जुन्याच योजनांचा पाढा वाचून दाखवल्यामुळे मुंबईकरांना नवीन असे काहीही मिळाले नाही. रुग्णालयांसाठी भरीव तरतूद असली, तरी अंमलबजावणी शून्य असते. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयातील बाहेरच्या रुग्णांवर शुल्कवाढ लादू देणार नाही.

राखी जाधव, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस


कोणत्याही प्रकारची दरवाढ आणि करवाढ नसून एक प्रकारे मुंबईकरांसाठी चांगला अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे स्वागत आहे.

रमेश कोरगावकर, अध्यक्ष, स्थायी समिती



हेही वाचा

पालिकेची आरोग्यसेवा महागली, शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

अग्निशमन दलासाठी 'बूस्टर'; ड्रोन, रोबोट्सची खरेदी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा