Advertisement

पालिकेची आरोग्यसेवा महागली, शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत वाढ


पालिकेची आरोग्यसेवा महागली, शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत वाढ
SHARES

मुंबई महापालिकेच्या आरोग्यविषयक सुविधांचे दर वाढवण्यात अाले असून मुंबईतील रहिवाशांसाठी वैद्यकीय सेवांच्या दरात २० टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. तर मुंबईबाहेरील रहिवाशांसाठी या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात अाल्याची घोषणा महापालिका आयुकत अजोय मेहता यांनी अाज पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र मोफत उपचार कायम राहणार अाहेत.


१० रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरण

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी १० उपनगरीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरण खरेदी करून पुरवठा करण्याचे ठरवले आहे. याशिवाय दहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये औषधे, सामग्री, डिस्पोजल तसंच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करत यासाठी ६१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


दवाखान्यांमध्ये गरीबांना प्राथमिक उपचार

नव्या आर्थिक वर्षात २५ दवाखान्यांची दुरुस्ती करून गरीबांना प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. केईएम रुग्णालयात दोन बहुमजली इमारती बांधण्यात येणार आहे. येत्या जुलैमध्ये या कामाला सुरुवात होईल. नागपाडा येथील बेलासिस रोडवरील नायर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली अर्ली इंटरव्हेंशन सेंटर बनवण्यात येणार आहे. या सेंटरसाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये विशेष मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांची सर्वंकष काळजी घेतली जाईल, असंही अायुक्तांनी बजेटमध्ये सांगितलं.


सर्व रुग्णालयांसाठी २३० व्हेंटिलेटर्स

सन २०१८ मध्ये खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या २३० व्हेंटिलेटर्स या सर्व प्रमुख रुग्णालय व उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. ३ आरोग्य केंद्र, २५ दवाखाने व ५ प्रसुतीगृह यांच्या सुधारणांसाठी ५०.७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भारत सरकारने सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या रुग्णांना पोषक आहार, रुग्ण प्रतिबंधक किट, पेडियाट्रिक डीआरटीबी सेंटर, कल्चर डीएसटीलॅब, १० रुग्ण बेड असलेले आयआरसीयू आदी राबवण्यात येणार असून यासाठी १३.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा - 

LIVE : मुंबई महापालिका बजेट २०१८-१९

शाळांच्या खासगीकरणाचा संकल्प, २५६९.३५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर

मुंबईकरांवर करवाढीचं ओझं नाहीच, जुन्याच योजनांचा गाढा पुढे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा