Advertisement

प्रविण छेडा आणि भारती पवार याचा भाजपात प्रवेश

मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रविण छेडा आणि भारती पवार याचा भाजपात प्रवेश
SHARES

मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे.


उमेदवारी मिळण्याची शक्यता

भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा स्वगृही परतले आहेत. प्रविण छेडा यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपाने गुरुवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये इशान्य मुंबईतील उमेदवारी घोषित केली नाही. मात्र, भाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. परंतू, त्यांना शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सोमय्यांऐवजी छेडा यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम

दरम्यान, प्रवीण छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. २०१४ मध्ये भारती पवार यांनी दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी राष्ट्रवादीनं त्यांना तिकीट नाकारत धनराज महालेंना संधी दिली आहे.



हेही वाचा -

शिवसेनेची लोकसभेची पहिली यादी जाहीर; मुंबईतून शेवाळे, किर्तीकर आणि अरविंद सावंत

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा