Advertisement

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

भारताचा माजी सलामीवीर गौतंम गंभीर याने शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवी शंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपात प्रवेश केला आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश
SHARES

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवी शंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर गौतम गंभीर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केल्याचं सांगितलं. तसंच, देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल गंभीरने भाजपाचे आभार मानले आहेत.


पक्षाला फायदा

गौतम गंभीरच्या पक्षप्रवेशानंतर अरूण जेटली यांना 'भाजपकडन गंभीरला लोकसभेचे तिकीट मिळणार का?’, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावेळ जेटली यांनी कोणत्या जागेवरून कोणाला तिकीट द्यायचे हा निर्णय पक्षाची निवडणूक समिती घेईल. मात्र, गंभीरने भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला.


पाकिस्तानचे समर्थक

प्रसारमाध्यमांशी बोलताना जेटली यांनी, काही माजी क्रिकेटपटू पाकिस्तानचे समर्थक झाले आहेत. मात्र, गंभीर हे त्यातील नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसच्या नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर त्यांनी टीका केली. त्याशिवाय सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे सॅम पित्रोदा यांच्यावरही जेटली यांनी टीका केली.



हेही वाचा -

पालघर लोकसभेसाठी 'बविआ'ला 'माकप'ची साथ

'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर' आजही टॅापवर!




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा