Advertisement

पालघर लोकसभेसाठी 'बविआ'ला 'माकप'ची साथ

पालघर लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी लाकसभेची जागा न सोडल्यामुळे माकपने हा निर्णय घेतला आहे.

पालघर लोकसभेसाठी 'बविआ'ला 'माकप'ची साथ
SHARES

पालघर लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी लाकसभेची जागा न सोडल्यामुळे माकपने हा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसंच यावेळी आ. हितेंद्र ठाकूर यांनीदेखील आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयाची प्रतिक्षा असल्याचं म्हटलं.

छोटे पक्ष प्रतिक्षेतच

आघाडीमध्ये सामिल होण्याची इच्छा असलेल्या माकपने यापूर्वी दिंडोरी लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. पंरंतु कम्युनिस्ट पक्ष, माकप, बविआ आणि अन्य छोट्या पक्षांबाबत आघाडीने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. तसंच दिंडोरी मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळं नाराज असलेल्या माकपने अखेर पालघर लोकसभेच्या जागेसाठी बविआची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच दिंडोरी मतदारसंघासाठी आग्रही असलेल्या माकपने त्या जागेवर आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पालघरच्या जागेसाठी बविआ उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

'तुमचा पाळणा कधी हलणार'?, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

प्रवीण छेडा स्वगृही परतणार?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा