Advertisement

'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर' आजही टॅापवर!

सध्या 'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर'च्या दुसऱ्या सीझनची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळंच त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच कारणामुळं डिजिटल आणि व्हायरल न्यूजमध्ये या दोन्ही वेब सिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे.

'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर' आजही टॅापवर!
SHARES

आज सिनेमे, नाटक आणि टीव्ही मालिकांच्या जोडीला वेब सिरीजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. सेन्सॅारचं बंधन नसल्यानं तरुणाईचा वेब सिरीजकडे ओढा वाढला आहे. त्यामुळंच वेब सिरीजच्या विश्वातही आज तगडी स्पर्धा पाहायला मिळते आहे. या स्पर्धेत 'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्जापूर' या वेब सिरीज आजही टॅापवर असल्याचं निदर्शनास आलं आहे.


क्राइम-थ्रिलर मालिका 

वेब सिरीजच्या जगतात गणेश गायतोंडे आणि कालीन भैया या व्यक्तिरेखांनी इतिहास रचला आहे. या व्यक्तिरेखा जितक्या लोकप्रिय आहेत, तितक्याच त्यांचा समावेश असलेल्या वेब सिरीजही आहेत. नेटफ्लिक्सची 'सेक्रेड गेम्स' आणि अमेझॉन प्राइमची 'मिर्जापूर' या दोन्ही क्राइम-थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेब सिरीज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. यासोबतच या महिन्यातच सुरू झालेली 'मेड इन हेवन' आजही चार्ट्सवर टॉप-५मध्ये पोहोचलेली नाही.


ब्रीद तिसऱ्या क्रमांकावर

स्कोर ट्रेंड्सनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार सध्या लोकप्रियतेत 'सेक्रेड गेम्स' पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी 'मिर्जापूर' आहे. आर. माधवन आणि अमित साध यांची भूमिका असलेली अमेझॉन प्राइमची वेब सिरीज 'ब्रीद' तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर किर्ती कुल्हारी-सायनी गुप्ता स्टारर 'फोर मोर शॉट्स प्लीज' चौथ्या स्थानी आहे. रोनित रॉय-मोना सिंह यांच्या भूमिका असलेली 'कहने को हमसफर है' पाचव्या स्थानावर विराजमान आहे.


दुसऱ्या सीझनची तयारी

सध्या 'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्ज़ापूर'च्या दुसऱ्या सीझनची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळंच त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच कारणामुळं डिजिटल आणि व्हायरल न्यूजमध्ये या दोन्ही वेब सिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेतील स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी घोषित केली आहे. लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी असलेली 'सेक्रेड गेम्स' डिजिटल न्यूज, न्यूज पेपर आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून नंबर वन स्थानी पोहोचली आहे.


युवा वर्गामध्ये  लोकप्रिय

 'मिर्जापूर'नं डिजिटल न्यूज़, सोशल आणि व्हायरल न्यूज श्रेणींमध्ये चांगला स्कोर केला आहे. 'फोर मोर शॉट्स प्लीज' सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे, तर ऑल्ट बालाजीची 'कहने को हमसफर है' नं गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून राहत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.



हेही वाचा - 

कलाकारांची होळी

पदार्पणातच अमृतानं स्वप्नीलसोबत जमवली जोडी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा