Advertisement

किरीट सोमय्या मुंबई महापालिकेचा १०० कोटींचा घोटाळा करणार उघड

किरीट सोमय्या मंगळवारी मुंबई महापालिकेचा १०० कोटींचा घोटाळा उघड करणार आहेत. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या मुंबई महापालिकेचा १०० कोटींचा घोटाळा करणार उघड
File photo
SHARES

किरीट सोमय्या मंगळवारी मुंबई महापालिकेचा १०० कोटींचा घोटाळा उघड करणार आहेत. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केला आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. अशातच आता आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

या मेळाव्यास किरीट सोमय्या, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, मोरेश्वर भोईर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

एम. एम. आर रिजनमधील महापालिकेचे घोटाळे उघड करणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा १०० कोटींचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा