Advertisement

वॉर्ड क्रमांक 106 मध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच


वॉर्ड क्रमांक 106 मध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच
SHARES

मुलुंड - महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्यात आणि मुलुंड पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 106 हा खूल्या गटासाठी असल्याने येथे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. इतर वॉर्डमधील उमेदवार देखील याच वॉर्डमधून निवडणुका लढवण्यास इच्छुक आहेत.
येथे सध्या मनसेच्या सुजाता पाठक या नगरसेवक आहेत. परंतू यावेळी मनसेतील सत्यवान दळवी 106 मधूनच निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. तसेच वॉर्ड 105 मधील नगरसेवक नंदकुमार वैती देखील यंदा 106 मधूनच निवडणूक लढवू शकतात. तर खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव निल सोमय्या देखील 106 मधूनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमुळे 106 मधील नगरसेविका सुजाता पाठक यांच्यासाठी परिस्थिती अवघड बनलीय. यामुळे त्यांना कदाचित 106 सोडून वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असलेल्या 105 मधून निवडणूक लढवावी लागू शकते. तरी सुजाता पाठक यांनी 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्यच असेल' अशी सावध भूमिका घेतली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार हे निश्चित.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा