मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

 Pali Hill
मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

मुंबई - राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. तसंच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

Loading Comments