शिवसेना-भाजपाचे महाभारत

  मुंबई  -  

  गोरेगाव -  भगवा झेंडा हाती घेऊन आणि शिवाजी महाराजांचे नाव घेऊन खंडणी वसूल केली जात आहे. अशांना भगवा झेंडा आणि शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हे उद्गार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. गोरेगाव येथील भाजपाच्या बूथ प्रमुखांच्या विजय संकल्प मेळाव्यात फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवरच नेम साधला.

  युती का तुटली हे मी सांगतो, असे स्पष्ट करत आम्ही शिवसेनेला १४७  जागा, भाजपाला १२७ आणि मित्रपक्षाला १८ असे जागा वाटप झाले होते. पण शिवसेना १५१ जागांवर अडून बसले. त्यामुळेच युती तुटली. जागांचा प्रश्न नव्हता, काही जागा कमी झाल्या चालतील, कारण आमचे विचार एक आहेत. पण यांच्या आचारात खोट आहे. मी जर पारदर्शक कारभाराची मागणी केली तर माझी काय चूक आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केला.
  दुर्योधन आणि शकुनी मामांनी ही युती तोडायला भाग पाडली. आम्हाला ६० जागा देऊन भाजपाला औकात दाखवली,  त्या शकुनी आणि दुर्योधनाला आम्ही त्यांची औकात दाखवू, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.