निवडणुकीचे वारे जोरात, विकासकामे जोमात

  Pali Hill
  निवडणुकीचे वारे जोरात, विकासकामे जोमात
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीपूर्वी विकास कामांचा सपाटा सत्ताधारी पक्षांनी लावला असून मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल 112 प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. यातील काही एक दोन प्रस्ताव वगळता सर्वच विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

  महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे स्थायी समितीत विकास कामांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील दोन स्थायी समिती बैठकीत अनुक्रमे 77 आणि 98 प्रस्ताव आले होते. तर मंगळवारी झालेल्या बैठकीत तब्बल 112 प्रस्ताव आले होते, यातील मोजके काही प्रस्ताव वगळता सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्यामुळे विकासाची कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रस्ताव स्थायी समितीपुढे पाठवले. विकास कामांचे प्रस्ताव असल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.