फैसला झाला, दोघांनाही लटकवले

 Mumbai
फैसला झाला, दोघांनाही लटकवले
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल अखेर लागला. ना भाजपाला 114 चा आकडा गाठता आला ना शिवसेनेला शंभरी. जनतेने या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत दिले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने शिवसेनेची निवड करत भाजपाला दुसऱ्या स्थानावर बसवत दोघांनाही सत्तेसाठी लटकवले. त्यामुळे सत्तेसाठी आपला स्वाभिमान बाजूला ठेवत हे दोन्ही पक्ष आता एकत्र येतात की शिव़सेना दुसऱ्या पक्षांच्या कुबड्यांची मदत घेऊन भाजपाला विरोधी पक्षात बसवते हेच पाहायचे आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. या निवडणूक निकालात पहिल्या फेरीपासून शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आघाडीवर होते. शेवटच्या निकालापर्यंत या दोन्ही पक्षांमध्येच चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत 227 पैकी शिवसेना आणि भाजपाचेच 166 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले. त्यांचे 84 नगरसेवक निवडून आले. त्याखालोखाल भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर काँग्रेसचे 31, मनसेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, एआयएमआयएम 2, अभासे आणि अपक्ष 6 अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु शिवसेना आणि भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. किंबहुना या दोन्ही पक्षांना इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या नगरसेवकांच्या कुबड्या घेऊनच या पक्षांना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. मात्र मुंबईचा महापौरच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. अशिष शेलार यांनी भाजपा हा पटीने वाढत असून पाचही अपक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगत आपल्याच पक्षाचा महापौर असेल असा दावा केला आहे.

जायंट किलर


क्रमांक
     विजयी उमेदवार
 
पक्ष

1
मनोज कोटक
भाजपा
2
अतुल शहा
भाजपा
3
पराग शहा
भाजपा
4
डॉ.सईदा खान
राष्ट्रवादी काँग्रेस
5
प्रभाकर शिंदे
भाजपा
6
विशाखा राऊत
शिवसेना
7
मिलिंद वैद्य
शिवसेना
8
त्यागराज दाभाडकर
भाजपा
9
मंगेश सातमकर
शिवसेना
10
किशोरी पेडणेकर
शिवसेना
11
समाधान सरवणकर
शिवसेना
12
रईस शेख
सपा
13
विश्वनाथ महाडेश्वर
शिवसेना
14
राजुल पटेल
शिवसेना
15
शुभदा गुडेकर
शिवसेना
16
राजश्री शिरवाडकर
भाजपा
17
श्वेता कोरगावकर
काँग्रेस
18
राजुल देसाई
भाजपा
19
आसावरी पाटील
भाजपा


दिग्गजांना फटका


क्रमांक
पराजयी उमेदवार
पक्ष
1
प्रवीण छेडा
काँग्रेस
2
विनोद शेलार
भाजपा
3
सुरेंद्र बागलकर
शिवसेना
4
डॉ. अनुराधा पेडणेकर
शिवसेना
5
स्वप्ना देशपांडे
मनसे
6
कृष्णा पारकर
भाजपा
7
मंगेश सांगळे
भाजपा
8
मोहन मिठबावकर
भाजपा
9
वकारुनिस्सा अंसारी
एआयएमआयएम
10
शीतल म्हात्रे
काँग्रेस
11
उपेंद्र दोषी
काँग्रेस
12
रितू तावडे
भाजपा
13
स्नेहल जाधव
मनसे
14
भालचंद्र शिरसाट
भाजपा
15
ज्योत्स्ना दिघे
काँग्रेस
16
संतोष धुरी
मनसे
17
अश्विनी मते
शिवसेना
18
लीना शुक्ला
भाजपा
19
मनाली तुळसकर
शिवसेना
20
नितेश सिंह
काँग्रेस
21
सना मलिक
राष्ट्रवादी काँग्रेस
Loading Comments