Advertisement

BMC वॉर्ड आरक्षण सोडत पूर्ण, जाणून घ्या कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव?

31 मे रोजी बीएमसी निवडणुकीसाठी जागांच्या आरक्षणाची लॉटरी पालिकेने काढली.

BMC वॉर्ड आरक्षण सोडत पूर्ण, जाणून घ्या कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव?
SHARES

राज्य निवडणूक आयोगाने (SEC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 236 प्रभाग आरक्षणांची लॉटरी BMC द्वारे 31 मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली.

110 जागा सर्वसामान्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर याच 109 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 8 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एसटीसाठी 1 जागा आणि एसटी महिलांसाठी 1 जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे.

शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. काही वॉर्डमधील आरक्षणामुळे ही काही विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे.

अनुसुचित जातींसाठी राखीव असलेले वॉर्ड

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली.

अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग असलेले प्रभाग : 60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215 आणि 221 हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

अनुसुचित जातींतील महिलांसाठी कोणते वॉर्ड

अनुसुचित जातीतील महिला गटांसाठी 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या वॉर्डमधील विद्यमान पुरुष नगरसेवकांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित

प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक - 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236

प्राधान्य क्रम २ (33) प्रभाग क्रमांक - 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234

सर्वसाधारण महीला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक - 44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232, 53



हेही वाचा

पालिकेची नवनीत-रवी राणा यांचा फ्लॅट असलेल्या इमारतीला नोटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा