Advertisement

पालिकेची नवनीत-रवी राणा यांचा फ्लॅट असलेल्या इमारतीला नोटीस

मुंबईतील नवनीत राणा यांच्या फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे.

पालिकेची नवनीत-रवी राणा यांचा फ्लॅट असलेल्या इमारतीला नोटीस
SHARES

मुंबईतील नवनीत राणा यांच्या फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे. इमारतीतील सर्वच फ्लॅटधारकांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस पाठवली आहे. नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आला होता.

मुंबईतील खार परिसरातील इमारतीत राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. राणा दाम्पत्याच्या फ्लॅटला बीएमसीने याआधी नोटीस पाठवली होती. आता खारमधील या इमारतीत राहणाऱ्या सर्वच फ्लॅटधारकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पालिकेचे अधिकारी या इमारतीचे ऑडिट करणार असून त्याचा अहवालही लवकरच जाहीर केला जाईल.

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याविरोधात पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस कोठडीत असताना आपल्याला चांगली वर्तणूक मिळाली नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

राज्य सरकारची भूमिका आणि पोलीसांनी दिलेली वागणूक याविषयी तक्रार करण्याकरिता नवनीत राणा यांनी नवी दिल्ली गाठली होती. केंद्र सरकारकडे त्यांनी यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यानंतर दिल्लीत हनुमान चालिसा पठण करत नवनीत राणा यांनी मोठे शक्ती प्रदर्शनही केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा अमरावतीत परतले.हेही वाचा

संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार, ठाकरेंनी शब्द न पाळल्याचा आरोप

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा