राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हायकोर्टाचा खडा सवाल


SHARE

रस्त्यांवर बस जाळल्या जात आहेत, पोलिसांवर दगडफेक केली जात आहे, असं होत असताना राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणावरील सुनावणीदरम्यान राज्यातील मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचाराची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरूवारी झापलं.


तपास अहवालावर नाराज

या हत्याप्रकरणाचा सीलबंद तपास अहवाल एसआयटी आणि सीबीआयने न्यायालयाला सादर केला. परंतु यासंदर्भातील तपास निष्काळजीपणाने केल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने हा अहवाल न वाचताच परत केला.

एवढंच नाही, तर गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कर्नाटकमधील विशेष तपास पथकाने ज्या वेगाने करत आरोपींना अटक केली. त्यातून पानसरे- दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी काही तरी शिकावं, अशा तिखट शब्दांत सूचनाही केली.


काय म्हणालं न्यायालय?

सध्या राज्यातील परिस्थिती अत्यंत विदारक आहे. बस जाळल्या जात आहेत, पोलिसांवर दगडफेक सुरू आहे, राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरुन सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली.हेही वाचा-

आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरोसंबंधित विषय
ताज्या बातम्या