राज्य सरकारच्या कारभाराला ३ वर्षे पूर्ण होत असताना या सरकारने केलेल्या चांगल्या कामांचे दाखले दिले जातील, अशी जनतेला आशा होती. मात्र तशी कुठलीही कामे नसल्याने सर्वसामान्यांची पुरती निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत कर्जमाफीचा कार्यक्रम उरकला. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. अशा या नाकर्त्या सरकारमुळे शेतकऱ्यांच्या पदरी दिवाळी आधीच निराशा पडल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
'सेना-भाजपाचे ३ साल, महाराष्ट्र बेहाल' पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या ३ वर्षांच्या कामाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाचं वर्षश्राद्ध घालण्यासाठी राज्यभर व्यापक आंदोलन करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. हे सरकार ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं ते म्हणत होते. मात्र त्यांनी आता त्यांनी त्यापुढे 'अ' हा शब्द लावावा, असं सांगत तटकरे यांनी सरकारची थट्टा केली.
राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्याला सरकारचे झालेले दुर्लक्ष जबाबदार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
सरकारला श्रेयवादाची घाई झाली आहे. आम्ही जेव्हा कर्जमाफी केली तेव्हा असा घोळ कधी झाला नाही. कर्जमाफी जाहीर करत असताना सरकारकडे सविस्तर आकडा यायला हवा होता. आपलं अपयश झाकण्यासाठी सरकार आमच्या सरकारवर आरोप करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं .
हेही वाचा -
कर्जमाफीच्या गोंधळाची केंद्र सरकारकडून दखल
सरकारने शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले, पण पैसे कुठे आहेत?