Advertisement

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा... भाजप खासदाराचं चॅलेंज

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे.

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा... भाजप खासदाराचं चॅलेंज
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.

बृजभूषण म्हणाले की, 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.'

ते पुढे म्हणाले की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं बृजभूषण यांनी म्हटलं आहे.

अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरू झालीय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली.

राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतलीय. त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.



हेही वाचा

मुंबईत उत्तर भारतीयांसाठी योगी सरकार कार्यालय उभारणार

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, हायकोर्टात याचिका सादर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा