बसपाचाही स्वबळावर लढण्याचा निर्णय

 Mumbai
बसपाचाही स्वबळावर लढण्याचा निर्णय

मुंबई - महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षानं घेतला असून, कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशी पक्षाची भूमिका बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी एका पत्रकाद्वारे मांडली आहे. बसपाला उत्तर भारतीय समाजाची साथ नेहमीच लाभली आहे. मुंबईत उत्तर भारतीय समाजाची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही बसपाला उत्तर भारतीयांची साथ नक्कीच मिळेल. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत उत्तर भारतीय समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही गरूड यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments