Advertisement

अर्थसंकल्पाला अर्थच काय? - उद्धव ठाकरे


अर्थसंकल्पाला अर्थच काय? - उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई - 2016 च्या अखेरीस नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणार. याबाबतची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात का केली नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. गेल्या वर्षीची आश्वासनं अद्याप अपूर्णच असल्याचं सांगत या अर्थसंकल्पाला अर्थच काय? अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.

‘नोटाबंदीमुळे सरकारकडे प्राप्तिकराच्या स्वरुपात मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात असले, तरी बडे कर्जबुडवे राहिले बाजूलाच आणि सर्वसामान्यांच्या खिशाला हात घातला गेला’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. नोटाबंदी करणार हे गेल्या अर्थसंकल्पात का जाहीर केलं नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीमुळे जनतेला सोसावी लागलेली झळ केव्हाच भरुन निघणार नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement