Advertisement

अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय?


अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय?
SHARES

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी नोटबंदीनंतरचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी संसदेत सादर केला. नोटबंदीच्या निर्णयामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. काय असेल यंदाच्या अर्थसंकल्पात? कोणत्या योजना जाहीर होणार? सामान्यांसाठी काय असेल? मुंबईकरांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? लोकल सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना जाहीर होतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बुधवारी लोकसभेत देशवासियांना मिळाली. मात्र त्यात मुंबईच्या वाट्याला काय आलं हे मुंबईकरांसाठी महत्त्वाचं होतं. नक्की काय आलं मुंबईच्या वाट्याला -:

करदात्या सामान्यांना दिलासा

 

  • 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 10 टक्क्यांऐवजी 5 टक्के कर
  • 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • 3 ते 5 लाख या उत्पन्नावर 5 टक्के कर. उदा. 2 लाखांसाठी 1 हजार रुपये कर
  • 5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात वार्षिक 12 हजार 500 रुपये सवलत. तर 50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना टॅक्ससोबतच 10 टक्के सरचार्ज
  • 50 कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी करात 5 टक्के सवलत
  • यामुळे लघुउद्योगांना 7,000 कोटींची संजीवनी मिळणार
  • स्टार्टअप्सना 3 वर्षांपर्यंत औद्योगिक करातून मुक्ती

 

करबुडवे आणि कर्जबुडव्यांना बडगा

  • बँकांची बुडित कर्जे चुकवणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठीचा नवा कायदा आणणार
  • विजय माल्ल्या आणि ललित मोदींसारख्या कर्जबुडव्यांकडून होणार वसुली

राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांवर चाप

 

 

 

 

 

 

  • 20 हजाराहून अधिक देणगी देणाऱ्यांची माहिती पक्षांनी दाखवावी
  • कॅशमध्ये फक्त 2 हजार रूपयांपर्यंतची देणगी पक्षांना स्विकारता येईल
  • 2 हजारावरची देणगी ऑनलाईन पेमेंट पद्धतीनेच द्यावी
  • देणगीदार बँकांकडून चेक किंवा डिजीटल पेमेंटवर बाँड खरेदी करून संबंधित पक्षाला देऊ शकतील
  • पक्षांच्या रजिस्टर्ड बँक खात्यांमध्येच देणगीदारांचे बाँड जमा होऊ शकतील

परिवहन क्षेत्रासाठी काय

 

 

 

 

 

 

  • रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींचं बजेट, 55 हजार कोटी सरकार देणार
  • 1 लाख कोटींचा राष्ट्रीय रेल सुरक्षा फंड
  • मेट्रो रेल्वेसाठी नवीन मेट्रो पॉलिसी जाहीर करणार
  • 2000 किलोमीटरच्या सागरी मार्गाचा(कोस्टल रोड) विकास करणार
  • 3 हजार 500 किमी नवे रेल्वे रुळ, 7 हजार रेल्वे स्टेशनवर सौरऊर्जा प्रकल्प
  • 500 रेल्वे स्थानकांवर लिफ्ट आणि सरकते जिने, 
  • सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट
  • सर्व मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंग 2020पर्यंत बंद करणार
  • स्वच्छ रेल्वे सुविधेसाठी ‘कोच मित्र सुविधा’
  • ई तिकीट खरेदी केल्यास सेवा कर लागणार नाही
  • पर्यटन आणि तीर्थ क्षेत्रांसाठी विशेष ट्रेन सुरू करणार
  • सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

मुंबईकरांचे स्वप्नातील घर होणार साकार

 

 

 

 

 

 

  • 2019 पर्यंत देशातल्या 1 कोटी लोकांना पक्की घरं बांधून देण्याचा मानस
  • सरकारी योजनेसाठीच्या जमीन अधिग्रहित झाल्यास त्यातून मिळालेली रक्कम करमुक्त

आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

 

 

 

 

 

 

  • रुग्णालयातील डॉक्टरांसाठीच्या 5000 अतिरिक्त जागांचा प्रस्ताव
  • 2025 पर्यंत क्षयरोग आणि टीबीचं निर्मूलन करण्याचं ध्येय
  • डॉक्टर संख्या वाढविण्यासाठी प्रवेशाच्या जागा वाढवणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्डच्या धर्तीवर हेल्थ स्मार्ट कार्ड

डिजीटल पेमेंट प्रोत्साहनासाठी

 

 

 

 

 

 

  • मार्च 2017पर्यंत 10 हजार स्वॅपिंग मशीन दिल्या जाणार 
  • क्रेडिट, डेबिट कार्ड नसणाऱ्यांसाठी आधार कार्डवर आधारित पेमेंट सुविधा लवकरच आणणार

काय म्हणतायत मुंबईकर?

दरवर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामान्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जातात. यंदा मात्र नोटबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांचंच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलं होतं. इन्कम टॅक्सची मर्यादा घटवून सरकारने नोटबंदीमुळे वैतागलेल्या सामान्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे अर्थसंकल्पावर नक्की मुंबईकरांचं काय म्हणणंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई लाइव्हने केला...

 

 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा