मतदारांनंतर आता देवाला साकडं?

 Girgaon
मतदारांनंतर आता देवाला साकडं?

गिरगाव - मंगळवारी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांचं भविष्य मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे. मात्र सध्या या उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. युती तुटल्यामुळे भाजपा-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 222 आणि 218 मध्ये या दोन्ही पक्षांनी दिग्गज उमेदवार दिले आहेत. काही पक्षांतील उमेदवारांनी थेट मंदिरात जाऊन साकडं घालत असल्याचं चित्र पहायला मिळालं. आता या उमेदवारांना देव पावतोय का हे 23 तारखेला निकालानंतरच कळेल. दरम्यान शिवसेना उमेदवार मिनल जुवाटकर यांनी मात्र देव माझ्यासोबत आहे मला साकडं घालायची गरज नसल्याचे सांगितले. तर मनसेच्या उमेदवार प्रिती गव्हाणे यांनी आमचा विजय निश्चित अाहे, फक्त देवाची साथ हवी यासाठी मंदिरात आल्याची प्रतिक्रिया दिली.

 

Loading Comments