Advertisement

नोटाबंदीचा इच्छुक उमेदवारांनाही फटका


नोटाबंदीचा इच्छुक उमेदवारांनाही फटका
SHARES

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. मात्र नोटाबंदीची झळ कित्येक इच्छुक उमेदवारांना पोहोचत असल्याचं पाहायला मिळतंय. अशीच काहीसी स्थिती आरपीआय गटाच्या विठ्ठल भिसे यांची झाली आहे. कुर्ल्यामधील 151 प्रभागामध्ये उमेदवारी हवी म्हणून त्यांनी पक्षाकडे फॉर्म भरला. फॉर्म भरण्यासाठी माझ्याकडे कॅश नव्हती त्यामुळे मी मित्रांकडून 2000 रुपयाची चिल्लर जमा केली आणि कार्यालयामध्ये फॉर्म भरल्याचं ते यावेळी म्हणालेत. विठ्ठल भिसे यांनी सुट्टे पैसे आणल्यामुळे पक्ष कार्यालयामध्ये 2000 रुपयांचे सुट्टे पैसे मोजताना पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची चांगलीचं दमछाक झाली. त्यामुळे हा भाजपाला खिजवण्याचा तर प्रयत्न नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. विठ्ठल भिसे यांनी तिकीट मिळणार की नाही हे माहित नाही मात्र चिल्लर देऊन त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय हे मात्र नक्की.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा