Advertisement

मराठा अारक्षण : उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल


मराठा अारक्षण : उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
SHARES

मराठा समाजाला १६ टक्के अारक्षण देण्याचा निर्णय गुरूवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात अाली. मराठी समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली अाहे. अाता मराठा अारक्षणप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं अाहे. कॅव्हेट दाखल केल्याप्रकरणी अारक्षणविरोधात याचिका दाखल केल्यास विनोद पाटील यांचं म्हणणं एेकून घेतल्याशिवाय निर्णय देता येणार नाही.


प्रक्रिया वेगाने होण्यासाठी

यापूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी अाघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के अारक्षण दिले होते. मात्र, या अारक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात अाली होती. त्यावेळी विनोद पाटील यांनी मराठा अारक्षणाच्या बाजूने याचिका दाखल केली होती. अाता देखील अारक्षणाला विरोध होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले अाहे. परिणामी मराठा अारक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्यास अाधी विनोद पाटील यांच्या म्हणणं एेकून घेणं अावश्यक ठरणार अाहे. दरम्यान, मराठा अारक्षणाची प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून कॅव्हेट दाखल केल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं अाहे. 



हेही वाचा -

मराठा आरक्षणानंतर आता धनगर-मुस्लिम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक; न्यायालयात घेणार धाव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा