Advertisement

मुंबईत चक्का जाम...


SHARES

मुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. दादर, दहिसर आणि चेंबूर परिरासत मराठा आंदोलनाचा परिणाम दिसून आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि चक्काजाम आंदोलन केलं. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत.

दादरमध्ये आंदोलक ताब्यात

चित्रा टॉकिज परिसरात मराठा समाजाच्या चक्काजामला सुरुवात झाली. त्यामुळे लालबाग ते दादर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दादरच्या पारशी जिमखाना परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी मोर्चा करु न दिल्यानं आंदोलनकर्ते शिंदेवाडीत गेले. या वेळी भोईवाडा पोलिसांनी महिला आणि पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतलं.

दहिसर चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा

चेकनाक्यावर मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केलं. त्यामुळे चेकनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. आंदोलकांनी दहिसर चेक नाक्यावरील गाड्या अडवून धरल्या होत्या. त्यामुळे चेक नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात महिलांनी रस्त्यावर बसून आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणा दिल्या.

चेंबूरमध्ये चक्काजाम ठरला अल्पजीवी

चेंबूरमध्ये ही मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम दिसून आला. पण, हे आंदोलन जास्त वेळ चाललं नाही. कडक बंदोबस्तामुळे आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा