छात्रभारती मुंबई विभागाची कार्यकारिणी जाहीर

 BMC office building
छात्रभारती मुंबई विभागाची कार्यकारिणी जाहीर
छात्रभारती मुंबई विभागाची कार्यकारिणी जाहीर
See all

परळ - छात्रभारती मुंबई विभागाची नवीन कार्यकारिणी शनिवारी जाहीर झाली. परळ (पूर्व) परिसरातल्या पोयबावाडी म्युन्सिपल शाळेतील शिक्षक भारतीच्या सभागृहात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

छात्रभारतीचे माजी मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. भालेराव यांच्या रीक्त असलेल्या पदी सचिन बनसोडे यांची सर्वानुमते मुंबई अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रुईया कॉलेजचे विशाल कदम, सहसचिवपदी मोहन गायकवाड आणि प्रसिद्धी प्रमुखपदी भगवान बोयळ यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील वर्षी होणार्‍या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छात्रभारती संघटनेत विद्यापीठ संघटक या पदाची निवड केली गेली. या पदासाठी रोहित ढाले यांची निवड करण्यात आली.

येत्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत छात्रभारती पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं नवनियुक्त कार्यकारणीद्वारे स्पष्ट करण्यात आलं.

Loading Comments