Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारी आजची कॅबिनेट बैठक या राज्यमंत्रीमंडळाची शेवटची बैठक असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांशी त्यांनी याविषयावर चर्चा केल्याचंही सांगण्यात येत आहे. महाविकस आघाडी सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारी आजची कॅबिनेट बैठक या राज्यमंत्रीमंडळाची शेवटची बैठक असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक बोलावली असून या बैठकीत ते महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे.

'मला काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही. समोर या. बसा. आपण निश्चितच काहीतरी मार्ग काढू,' असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आवाहनाला बंडखोर आमदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंचे पत्र जशास तसे...

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या..माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे



हेही वाचा

संपर्कात असलेल्या आमदारांची नावं उद्धव ठाकरेंनी जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचे आव्हान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा