Advertisement

संपर्कात असलेल्या आमदारांची नावं उद्धव ठाकरेंनी जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचे आव्हान

हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संपर्कात असलेल्या आमदारांची नावं उद्धव ठाकरेंनी जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचे आव्हान
SHARES

शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. 

मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्या गटातील 20-21 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आमदार मुंबईत आल्यानंतर पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले. कोणताही आमदार बाहेरच्यांशी संपर्कात नसल्याचा दावा त्यांनी केला.



हेही वाचा

कुर्ला इमारत दुर्घटना : सरकारच्या आधी एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात, 'इतक्या' भरपाईची घोषणा!

एकनाथ शिंदे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, ११ जुलैला पुढील सुनावणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा