ख्रिस्ती संघटनांची काँग्रेसकडे जागांची मागणी

  Dadar
  ख्रिस्ती संघटनांची काँग्रेसकडे जागांची मागणी
  मुंबई  -  

  दादर - बॉम्बे कॅथलिक सभा, ऑल इंडिया कॅथलिक युनियन, मुंबई ईस्ट इंडियन असोसिएसन आणि ऑल महाराष्ट्र चर्च या संघटनांनी काँग्रेसला मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. या संघटनांनी माजी मुखमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पाठिंबा दर्शविला. मुंबईमध्ये ख्रिश्चन समाज वर्षांनुवर्ष रहात आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे अस्तित्व नाही. त्यामुळे मुंबईतील ख्रिश्चन भागात 15 जागा ख्रिश्चन उमेदवारांना द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुंबईमध्ये काही घरांमध्ये एकत्र येशूची प्रार्थना घेतल्यावर काही संघटना घरात घुसून तोडफोड करून धर्मांतरण करतात. अशावेळी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी ठिकठिकाणी सरंक्षण करावे, अशी विंनती मुंबईतील ख्रिश्चन समाजाच्या संघटनांनी केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.