राज्यात तेढ निर्माण करण्याचा डाव - मुख्यमंत्री

 Pali Hill
राज्यात तेढ निर्माण करण्याचा डाव - मुख्यमंत्री
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचं काम काही जणांकडून सुरू आहे, 'व्हॉट्स अॅपवरून भावना भडकवणारे मेसेजही फिरवले जात आहेत. हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. तरी जनतेनं शांतता पाळावी' असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिकच्या घटनेबाबत ते बोलत होते. या वेळी त्यांनी 'अॅट्रोसिटी रद्द करण्याची कुणाचीही मागणी नाही. कायद्याचा गैरवापर रोखण्याची मागणी आहे आणि त्यावर सर्वांशी चर्चा करता येईल' असंही स्पष्ट केलं.

Loading Comments