Advertisement

भाजपाविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी


भाजपाविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी
SHARES

भांडुप - भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात भांडुपमधील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन केलं. या वेळी 'पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या बाजूनं आम्ही ठाम उभे आहोत, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध असो, भाजप सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत, पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया कदम, भांडुप महिला अध्यक्ष प्रिया पांडे यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन झालं. 

येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपलं भांडुपमधलं अस्तित्व दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली  आहे. तसंच पालिका निवडणुकांसाठी पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू असून कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करून पक्षाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतोय. याचा फायदा येत्या निवडणुकीत काँग्रेसला कसा होतो, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement