• संभाजी ब्रिगेडची पहिली यादी जाहीर
SHARE

मुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. प्रस्थापित पक्षांबरोबरच आता संभाजी ब्रिगेड सारख्या नवख्या पक्षाने देखील मुंबई महानगरपालिकेत सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी संभाजी ब्रिगेडने उमेदवारांची पहिली 20 जाणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. एकूण 350 जणांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभागाचे प्रचार प्रमुख संतोष परब, मुंबई अध्यक्ष अमोल जाधवराव, मुंबई कार्याध्यक्ष अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान रविवारी कुलाबा विभागातून भव्य रॅली काढून प्रचाराला सुरूवात करणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख संतोष परब यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या