चेंबूरमध्ये भाजपाकडून निवडणुकीची जोरदार तयारी

 Chembur
चेंबूरमध्ये भाजपाकडून निवडणुकीची जोरदार तयारी
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर अाल्यानं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेत. मात्र चेंबूर परिसरात इतर पक्षांपेक्षा भाजापकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय. प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी चेंबूरमध्ये भाजपाकडून विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. याशिवाय चेंबूर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल वाळंज यांच्या रुपानं भाजपाला तरुण चेहरा मिळाल्यानं सर्वत्र उत्साह आहे. पाच दिवसांपूर्वी वाळंज यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानं चेंबूरमध्ये आमचं पारडं जड असून, चेंबूर विधानसभा क्षेत्रातील पाचही जागा जिंकून आणू, असा विश्वास वाळंज यांनी व्यक्त केलाय.

Loading Comments