भाजपाचे प्रवीण शहा सर्वाधिक मतांनी विजयी

  Mumbai
  भाजपाचे प्रवीण शहा सर्वाधिक मतांनी विजयी
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बोरीवली पश्चिम भागातील भाजपाचे उमेदवार प्रवीण शहा यांनी सर्वांधिक मतांनी अर्थात १९ हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. मुंबईतील सर्वांधिक मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी समसमान मते मिळाल्यामुळे केवळ चिठ्ठीमुळे शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांचा पराभव झाला आहे.

  भाजपाचे प्रविण शहा यांच्यानंतर शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांनी सहा हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. तर शिवसेना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांचा केवळ १६ मतांनी पराभव झाला. तर याव्यतिरिक्त भाजपच्या कमला राज पुरोहित १७ मते, संतोष केळकर ४० मते, कृष्णा पारकर ३४ व जैसल कोठारी ८४ मतांनी पराभूत झाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.