अगा जे घडलेच नाही...?

मुंबई - राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून देणारा अंगणवाड्यांमधल्या चिक्की घोटाळा घडलाच नाही. एसीबीनं तसा स्पष्ट निर्वाळा दिलाय. राज्याच्या महिलाविकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना वादाच्या गर्तेत ओढणारा भ्रष्टाचार झालाच नसल्याचं एसीबीच्या चौकशीत स्पष्ट झालंय. आता एसीबीनं या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाइल बंद केल्यामुळे पंकजा मुंडे-पालवे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला नवे धुमारे फुटले आहेत.

Loading Comments