Advertisement

२६/११ स्मृतीदिन: शहीद पोलिसांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची आदरांजली


२६/११ स्मृतीदिन: शहीद पोलिसांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची आदरांजली
SHARES

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथील स्मृती स्थळावर आदरांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, भाई जगताप, मुख्य सचिव सुमित मलिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी तसेच शहीद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी शहीद कुटुंबीय आणि उपस्थित अधिकारी यांच्याशी संवाद साधला तसेच उपस्थित 'फोर्स वन'च्या कमांडोजच्या तयारीची माहिती घेतली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा