Advertisement

मुंबादेवी मंदिराला स्वतंत्र अधिनियम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


मुंबादेवी मंदिराला स्वतंत्र अधिनियम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
SHARES

मुंबादेवी, मुंबईतल्या लाखो जनतेचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण! याच मुंबादेवीच्या नावाने मुंबईला मुंबई हे नाव पडलं. या मुंबादेवी मंदिराचं सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाखाली स्वतंत्र विश्वस्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विधेयकावर उत्तर देताना दिली.


मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

भाजपाचे आमदार आणि नुकताच कॅबिनेट दर्जा प्राप्त झालेले राज पुरोहित यांनी मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, सोयी सुविधांचा अभाव तसेच दान स्वरुपात मिळणारे कोट्यवधी रुपयांची देणगी यात येथील तथाकथित पुजारी भ्रष्टाचार करत असल्याचं लक्ष वेधलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी हे आश्वासन दिलं.

विशेष म्हणजे मुंबादेवी मंदिराला स्वतंत्र विश्वस्त मंडळ असावे, अशी मागणी राज पुरोहित यांनी सभागृहात करताच राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील पाठिंबा दिला.


मी गेली अनेक वर्ष याबत आवाज उठवत आहे. ही बाब त्यावेळच्या आघाडी सरकाराच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र आता कुठे तर माझ्या मागणीला यश मिळत असल्याचं वाटत आहे.

- राज पुरोहित, प्रतोद, भाजपा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा