Advertisement

सेवा ज्येष्ठता डावलल्याने 2 सनदी अधिकारी नाराज


सेवा ज्येष्ठता डावलल्याने 2 सनदी अधिकारी नाराज
SHARES

सेवाज्येष्ठतेचा क्रम डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती केली. यामुळे आता दोन अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.


'ते' दोन अधिकारी कोण?

डी. के. जैन यांच्याहून ज्येष्ठ अधिकारी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त सचिव मेधा गाडगीळ आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव होते. सेवाज्येष्ठतेचा क्रम डावलून डी. के. जैन यांची निवड केल्याने


नाराज अधिकारी रजेवर

मेधा गाडगीळ एका महिन्याच्या दीर्घकालीन रजेवर गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. तर मेधा यांच्यापाठोपाठ सुधीरकुमारही चार दिवसांच्या रजेवर गेले आहेत. हे दोघेही नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.


अधिकारी वर्गात नाराजीचे सूर

मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठांच्या दबावाने या दोन्ही ज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलून डी. के. जैन यांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे असा मतभेद कशासाठी याबाबत अधिकारी वर्गात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) 1983 च्या बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, दिनेश कुमार जैन, यू. पी. एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा