शिवसेना गुन्हेगारांचा पक्ष - मुख्यमंत्री

 Prabhadevi
शिवसेना गुन्हेगारांचा पक्ष - मुख्यमंत्री
Prabhadevi, Mumbai  -  

प्रभादेवी - शिवसेना हा गुन्हेगारांचा पक्ष असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवीच्या जाहीर सभेत केला. सामना ऑफिसच्या समोर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी हा घणाघात केला.

भाजपाचे अनेक नेते गुन्हेगार असल्याचं बोलल जातं परंतु शिवसेनेचेच अनेक नेते गुन्हेगार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिवसेना नेत्यांची आकडेवारी देखील त्यांनी जाहीर केली. शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार असल्याचे सांगत त्यांनी साधे 43 गुन्हे तर गंभीर 81 गुन्हे त्यांच्यावर असल्याचे सांगत आकडेवारी जाहीर केली. तसेच युती तोडणारे शकुनीमामा याच बिल्डिंगमध्ये बसतात असा टोला त्यांनी सामनाच्या कार्यलयाकडे बोट दाखवून केला.  

दरम्यान, यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिववडापावच्या गाड्या लाच घेऊन लावल्या जातात असा आरोपही शिवसेनेवर केला. तसेच मराठी मुलांना मिंधं करण्याचं काम शिवसेनेने केलं. काँगेस आणि शिवसेनेने वरळी, परळ भागात भ्रष्टाचार केला. मराठी मुलांना नोकऱ्या दिल्याच नाहीत. ही निवडणूक बिल्डरांच्या दलालांच्या विरोधातली असल्याचंही ते म्हणाले.

Loading Comments