महापालिकेच्या जीवावर यांचं घर चालतं - मुख्यमंत्री

  Sion
  महापालिकेच्या जीवावर यांचं घर चालतं - मुख्यमंत्री
  मुंबई  -  

  सायन -  मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्र्याची दक्षिण मध्य मुंबईत सायनच्या सोमय्या मैदानावर प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. पुण्यातील सभा रद्द झाली ती चार वाजता होती मिस कम्युनिकेशन होत मी अडीचला पोहचलो. काही लोकांना उकळ्या फुटल्या पण लोक तुम्हालाच रद्द करतील असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिवसेनेला महानगरपालिकेच्या जीवावर घर चालवायचं आहे. आम्हाला घर नाही चालवायचं तर मुंबई महाराष्ट्र आणि जनतेचा विकास कारायचा. उद्धव ठाकरेंना व्हिजनच नाही ,मुद्दे नाहीत म्हणून ते जनतेचं मन विचलित करण्यासाठी वेगळे मुद्दे उपस्थित करत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान नालेसफाईसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले पण नालेसफाई काही झाली नाही असा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी केला. झोपडपट्टीवासीयांना घर देण्यासाठी जास्त एफएसआय देऊ प्रत्येकाला 550 स्वे. फुटाचं घर देऊ अशी एक ना अनेक आश्वासने यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.​

  संपूर्ण सभा पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
  https://www.facebook.com/MumbaiLiveNews/videos/1194443130670423/

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.