Advertisement

उद्धव, मुख्यमंत्री यांची महापौर बंगल्यात भेट

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महापौर बंगल्यावर भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजी पार्कवर येण्याचं उद्धव यांनी टाळलं.

उद्धव, मुख्यमंत्री यांची महापौर बंगल्यात भेट
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनामित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना शनिवारी दुपारी आदरांजली वाहिली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महापौर बंगल्यावर भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजी पार्कवर येण्याचं उद्धव यांनी टाळलं. भाजपा-शिवसेना युतीतील वाढलेल्या तणावामुळेच उद्धव यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


१५ मिनिटे चर्चा

बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क इथं दुपारी पोहचले. त्यानंतर त्यांनी महापौर बंगल्यावर उद्धव यांची १५ मिनिटे भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील, अशी अटकळ होती. परंतु उद्धव यांनी त्यांच्यासोबत जाण्याचं टाळलं.


स्मृतीस्थळावर एकटे

शिवाजी पार्क इथं शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांना सामोरे गेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. परंतु इथंही उद्धव न आल्याने दोघांमधील तणाव कायम असल्याची चर्चा यावरून रंगली आहे.



हेही वाचा- 

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच लाॅबिंग?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा