Advertisement

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच लाॅबिंग?

एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यावर आपली पोळी भाजण्यासाठी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्यातच निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसत आहे.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच लाॅबिंग?
SHARES

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभेची निवडणूक न लढवता विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गुरूवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसताना चव्हाण काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशीही चर्चा आहे. याकडे पाहता काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी लाॅबिंग सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.

निवडणुकीची तयारी सुरू

एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यावर आपली पोळी भाजण्यासाठी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्यातच निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसत आहे.

कार्यकर्त्यांची इच्छा

अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक न लढवण्यामागे तर्क लावला जात आहे की, ते येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. यावर मी मी नांदेड जिह्यातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, पक्ष जी जबाबदारी देईल, ती आपण पार पाडू, असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.

पत्नीला तिकीट?

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ २ खासदार निवडून आले होते. त्यात अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. चव्हाण यांच्या जागी नांदेडमधून त्यांच्या पत्नीला तिकीट मिळू शकतं असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा-

शिवसेना राजस्थानमध्येही निवडणूक लढवणार

मुंबईत २५ नोव्हेंबरला 'संविधान बचाओ' रॅली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा