Advertisement

शिवसेना राजस्थानमध्येही निवडणूक लढवणार

शिवसेनेचे राजस्थान प्रदेश संपर्क प्रमुख राजकुमार बाफना यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की, राजस्थानमध्ये शिवसेना सर्व २०० जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेना राजस्थानमध्येही निवडणूक लढवणार
SHARES

राज्याबाहेरील राजकारणात उडी घेत उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणारी शिवसेना आता राजस्थानमध्येही निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे.


पहिल्या २ नावांची घोषणा

शिवसेनेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत ८ जागांचा समावेश आहे. यामध्ये  अलवर विधानसभा क्षेत्रातून किशोर कपूर तर बानसूर विधानसभा क्षेत्रातून भविंद्र पटेल यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर आदर्श नगरमधून इंद्रजीत कौल, रांगानेरमधून कालूराम साहू, करवलीमधून साहबसिंग गुर्जर, पुष्करमधून आनंदी प्रसाद डाबी, वल्लभ नगरमधून पन्नालाल मोनारिया आणि शाहपूरमधून गजानन रेगर यांचाही समावेश आहे. 


सर्व जागा लढणार

इतर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. शिवसेनेचे राजस्थान प्रदेश संपर्क प्रमुख राजकुमार बाफना यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की, राजस्थानमध्ये शिवसेना सर्व २०० जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेनेने १७ ते २५ आॅक्टोबर दरम्यान राजस्थानमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुकांकडून अर्ज मागवले होते.



हेही वाचा-

भाजपा प्रवक्ते संबित पात्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदीतून तासभर भाषण करणार?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा