Advertisement

भाजपा प्रवक्ते संबित पात्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पात्रा यांचं वक्तव्य धार्मिक भावना भडकावणारं आणि उत्तेजक होतं. यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

भाजपा प्रवक्ते संबित पात्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
SHARES

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबईतील अग्रीपाडा पोलिस ठाण्यात केली आहे. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एमआयएम) चे प्रवक्ते सय्यद असिम वकार यांच्याविरोधात धार्मिक आणि भडकाऊ भाष्य केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


तक्रारीचं कारण काय?

गेल्या आठवड्यात ८ नोव्हेंबर रोजी एका वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान वकार यांनी उत्तर प्रदेशातील एकना इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीचं नाव बदलून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी करण्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळेस चर्चेदरम्यान पात्रा यांनी वकार यांना शांत राहा, अन्यथा कुठल्याही मस्जिदीला भगवान विष्णू यांचं नाव देण्यात येईल, अशा शब्दांत धमकी दिल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.


उत्तेजक भाषा

पात्रा यांचं वक्तव्य धार्मिक भावना भडकावणारं आणि उत्तेजक होतं. यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा