Advertisement

मुंबईत २५ नोव्हेंबरला 'संविधान बचाओ' रॅली

भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसने या 'संविधान बचाओ' रॅलीचं आयोजन केलं असून या रॅलीत विरोधी पक्षही सहभागी हाेत आहेत. ही रॅली दादरच्या राजगृह इथून सुरू होऊन चैत्यभूमी इथं जाऊन संपेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत २५ नोव्हेंबरला 'संविधान बचाओ' रॅली
SHARES

संविधान सप्ताहाअंतर्गत काँग्रेससह विरोधी पक्षांनी २५ नोव्हेंबर रोजी 'संविधान बचाओ रॅली'चं मुंबईत आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि डाव्या विचारसरणीचे नेते कन्हैय्या कुमार सहभागी होण्याची शक्यता आहे.


रॅली कुठून कुठे?

भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसने या 'संविधान बचाओ' रॅलीचं आयोजन केलं असून या रॅलीत विरोधी पक्षही सहभागी हाेत आहेत. ही रॅली दादरच्या राजगृह इथून सुरू होऊन चैत्यभूमी इथं जाऊन संपेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अजून या रॅलीच्या मार्गाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


हिवाळी अधिवेशन

येत्या १९ नोव्हेंबरपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय इ. प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.



हेही वाचा-

अभिनेत्री पूनम ढिल्लों बनली भाजपाची मुंबई उपाध्यक्ष

महिला प्रवासी सुरक्षित नसतील, तर 'श्री रामायण एक्स्प्रेस'चा अर्थ काय? निरूपम यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा