Advertisement

अभिनेत्री पूनम ढिल्लों बनली भाजपाची मुंबई उपाध्यक्ष

पूनम ढिल्लों यांनी २००४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेव्हापासून त्या राजकारणात म्हणाव्या तशा सक्रीय नव्हता. तरीही नवीन जबाबदारी मिळाल्याने त्या पुन्हा एकदा पक्षात जोमाने कामाला लागणार आहेत.

अभिनेत्री पूनम ढिल्लों बनली भाजपाची मुंबई उपाध्यक्ष
SHARES

नव्वदीच्या दशकात आपल्या अदाकारीने सिनेरसिकांचं मन जिंकणारी बाॅलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लों लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. पूनम ढिल्लो यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या उपाध्यक्षपादाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पूनम ढिल्लों यांनी २००४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेव्हापासून त्या राजकारणात म्हणाव्या तशा सक्रीय नव्हता. तरीही नवीन जबाबदारी मिळाल्याने त्या पुन्हा एकदा पक्षात जोमाने कामाला लागणार आहेत.

जबाबदारी सांभाळणार

प्रसार माध्यमांसोबत बोलताना त्या म्हणाल्या की, ''मी २००४ मध्ये भाजपात आले होते. परंतु वेगवेगळ्या वैयक्तीक जबाबदाऱ्यांमुळे मला राजकारणात म्हणावं तसं सक्रीय राहता आलं नाही. मला २ लहान मुलं होती. पण आता ती मोठी झाल्याने माझ्यावरील जबाबदारीचं ओझं कमी झालं आहे. त्यामुळे मी नव्या पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकते. ''

४० वर्षांपूर्वी पदार्पण

पूनम ढिल्लों यांनी ४० वर्षांपूर्वी यशराज फिल्म्सच्या त्रिशूल सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यांनी ८० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. यांत नूरी, जय शिव शंकर आणि सोनी महिवाल इ. लोकप्रिय सिनेमांचा समावेश आहे.हेही वाचा-

महिला प्रवासी सुरक्षित नसतील, तर 'श्री रामायण एक्स्प्रेस'चा अर्थ काय? निरूपम यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका

व्यंगचित्रातूनच भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्लीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा