महिला प्रवासी सुरक्षित नसतील, तर 'श्री रामायण एक्स्प्रेस'चा अर्थ काय? निरूपम यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका

श्री रामायण एक्सप्रेसचा काय अर्थ आहे, जर आपल्या सीताच सुरक्षीत नसतील तर‘, अशाप्रकारची टीका संजय निरुपम यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यावर केली आहे.

SHARE

एका बाजूला महिला रेल्वे प्रवाशांवरील लैंगिक छळाच्या प्रमाणात वाढ होत असताना, दुसऱ्या बाजूला रामाच्या नावाने 'श्री रामायण एक्स्प्रेस' सुरू करायची याला काय अर्थ आहे? असं म्हणत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यावर ट्विटरवरून टीका केली.


काय आहे रामायण एक्स्प्रेस?

रामायण एक्स्प्रेस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. नवी दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकातून सुटणारी ही रामायण एक्स्प्रेस अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नासिक, हम्पी आणि रामेश्वरम् या स्थानकांवर थांबून प्रवाशांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणार आहे. एकूण ८०० प्रवासी क्षमतेच्या या एक्स्प्रेसचं तिकीट १५,१२० रुपये इतकं आहे. या एक्स्प्रेसवरून निरूपम यांनी गोयल यांना धारेवर धरलं आहे.

काय म्हणाले निरूपम?

लोकलमधील महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रमाणात मागील २ वर्षांच्या तुलनेत ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये छेडछाडीच्या ६३ घटना घडल्या होत्या. तर, २०१७ मध्ये ७४ आणि २०१८ मध्ये आतापर्यंत ११८ छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. श्री रामायण एक्स्प्रेसचा काय अर्थ आहे, जर आपल्या सीताच सुरक्षीत नसतील तर‘, अशाप्रकारची टीका संजय निरुपम यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यावर केली आहे.

लोकलमधील प्रवाशांची वाढती संख्या, वाढती गर्दी यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास दिवसोंदिवस त्रासदायक होत चालला आहे. त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास महिला प्रवाशांकरीता सुरक्षीत आहे का? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.हेही वाचा-

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावासंबंधित विषय
ताज्या बातम्या