Advertisement

व्यंगचित्रातूनच भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्ली

महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. भाजपाचं व्यंगचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे.

व्यंगचित्रातूनच भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्ली
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा सर्वांवरच फटकारे ओढण्याचा सपाटा लावला आहे. राज यांची टीका भाजपाला चांगलीच जिव्हारी लागली अाहे. त्यामुळे अाता राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना भाजपानं व्यंगचित्राच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 


ट्विटरवर व्यंगचित्र 

महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. निवडणूक जवळ आली तरी राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटण्यातच गुंग अाहेत. तर निवडणुकीत मनसे भुईसपाट झाली तरीही राज ठाकरे व्यंगचित्रातच मग्न अाहेत, अशा आशयाचं भाजपाचं व्यंगचित्र सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल होतं आहे.


कार्टून साहेब

धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजन, नरक चतुदर्शी, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सकाळी सकाळी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध करत भाजपासह अनेक जणांची खिल्ली उडवली होती. तर मंगळवारी अवनी वाघीणीच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्राचा वाघ २०१९ मध्ये फाडून खाईल असं व्यंगचित्र काढलं होतं. या व्यंगचित्रानंतर मात्र भाजपानं मौन सोडत व्यंगचित्रातूनच राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब असं म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.


व्यंगचित्रातच मग्न

महाराष्ट्र भाजपाच्या व्यंगचित्रात एका ठिकाणी राज ठाकरेंना कार्यकर्ते सांगत अाहेत की साहेब लोकसभा निवडणूक जवळ आली, राज ठाकरे मात्र व्यंगचित्रच काढत अाहेत. पुढच्या चित्रात कार्यकर्ते सांगत अाहेत साहेब विधानसभा निवडणूक जवळ आली, पण साहेबांचं यावेळीही लक्ष नाही. तर तिसऱ्या चित्रात आपला एकही उमेदवार निवडून आला नाही असं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांकडंही राज ठाकरे यांचं लक्ष नाही. पुन्हा ते व्यंगचित्रातच मग्न असलेले दिसत आहेत. 



हेही वाचा - 

अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदीतून तासभर भाषण करणार?

रात्रीपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल होणार सादर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा