Advertisement

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही... राज ठाकरेंची आतिषबाजी

भाऊबीजेच्या निमित्ताने काढलेल्या व्यंगचित्रात राज यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींच्या घोषणा आणि सद्यस्थिती यांची तुलना करत सरकारच्या अपयशावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे.

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही... राज ठाकरेंची आतिषबाजी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीदरम्यान काढलेल्या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. भाऊबीजेच्या निमित्ताने काढलेल्या व्यंगचित्रात राज यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींच्या घोषणा आणि सद्यस्थिती यांची तुलना करत सरकारच्या अपयशावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. तसंच २०१९ मध्ये ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असेही संकेत दिले आहेत.


काय आहे व्यंगचित्रात?

राज यांनी काढलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊबीजेसाठी पाटावर बसलेले दिसत आहेत. तर भारतमातेने नाराज होऊन त्यांच्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. तसंच गेल्या वेळेस ओवाळले, पण यापुढे ओवाळणार नाही, असंही म्हणताना दाखवत, पुढच्या निवडणुकीत भारतीय जनता मोदींना नाकारेल, असे संकेत दिले आहेत.

आश्वासने

व्यंगचित्रात एका बाजूला मोदींनी २०१४ मधील निवडणुकीआधी दिलेली आश्वासने जसे. १०० दिवसांत महागाई कमी करणार, देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देणार, दर वर्षी २ कोटी नोकऱ्या देणार इ. दाखवलेली आहेत.


सद्यस्थिती

तर, दुसऱ्या बाजूला २०१८ मधील सद्यस्थिती म्हणजेच 'बेरोजगारीत प्रचंड वाढ', राफेल भ्रष्टाचार, 'फरार मल्ल्या', 'निरव मोदी', 'मेहुल चोक्सी', 'काळा पैसा', 'रुपयाची घसरण', 'शेतकरी आत्महत्या' आणि 'भाजपच्या तिजोरीत वाढ', 'रिझर्व बँकेवर घाला', 'सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला', 'वर्तमानपत्रे आणि मीडियाची मुस्कटदाबी', 'पेट्रोल डिझेलच्या किंमती', 'निवडणूक आयोगाची गळचेपी', 'महिलांवरील अत्याचारात वाढ', असे मुद्दे उपस्थित करून सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

याआधी राज यांनी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी पूजन, पाडवा या दिनानिमित्त विशेष व्यंगचित्र रेखाटत सरकारवरील टीकेचे फटाके फोडले आहेत.



हेही वाचा-

राज यांची आतिषबाजी, मुख्यमंत्र्यांसह अमित शाहंवर टीका

सोशल मीडियातील प्रचारयुद्धाला मनसे पदाधिकारी 'सज्ज'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा