Advertisement

रात्रीपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल होणार सादर


रात्रीपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल होणार सादर
SHARES

गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाकडून आरक्षणची मागणी होत असून या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. असं असताना आता मराठा समाजाला प्रत्यक्षात आरक्षण देता येईल का? हे आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर होण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी १५ नोव्हेंबरला राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार असून काही दिवसांची मुदत मागण्यात येण्याचीही शक्यता आहे.


मुख्यमंत्र्यांकडे होणार सादर 

दोन लाख निवेदन आणि ४५ हजार कुटुंबाचा अभ्यास करत मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा अहवाल तयार केला आहे. ११ आणि १२ नोव्हेंबरला आयोगाने मॅरेथॉन बैठका घेत अहवाल तयार केला असून हा अहवाल १४ नोव्हेंबरला रात्री पर्यंत मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार आहे.


महाराष्ट्राचं लक्ष याकडे

आधी दिलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस आयोगाकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्यात मराठा समाजाची नेमकी संख्या किती आणि कुणबी तसंच मराठा समाज हा एकच आहे का? अशा अनेक प्रश्नांची उकलही करण्यात आल्याचं समजतं आहे.

आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास अनुकलता दर्शवली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचे आणि महाराष्ट्राचं लक्ष आता राज्य सरकारच्या पुढच्या भूमिकेकडे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा