Advertisement

सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी नाकारला


सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी नाकारला
SHARES

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये शुक्रवारी दिले. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी शनिवारी सकाळी वर्षा या निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.


घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी सुरु असताना त्या पदावर राहू नये, असं मला वाटलं. म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. पण राजीनामा देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आणि तो स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी होणाऱ्या चौकशीला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. चौकशीअंती जे समोर येईल. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल.

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र

दरम्यान,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुभाष देसाई यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सुभाष देसाईंनी माझ्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार त्यांनी राजीनामा सादर केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला. मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती चौकशी करण्याचे वचन दिले आहे, तशी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल ही अपेक्षा. पक्ष देसाईंच्या पूर्णपणे पाठिशी आहे. राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे. आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. 'आरोप कर राजीनामा घे' हा पायंडा पडला तर तो महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसा नाही,  असे शिवसेना विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तत्कालीन मंत्र्यांचे राजीनामे मागणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले.



हे देखील वाचा - 

मेहता - देसाई राजीनामे द्या! विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा